संपादक-२००३ - लेख सूची

संपादकीय आगामी विशेषांकांबद्दल

आपला येता (जानेवारी—फेब्रुवारी २००४) अंक हा आधुनिक विज्ञानाचे स्वरूप या विषयावरचा विशेष जोडअंक असेल. त्यानंतरचा अंक मार्चचा असेल. या विशेषांकाचे संपादक चिंतामणी देशमुख व्ही. जे. टी. आय. मध्ये तीस वर्षे भौतिकीचे अध्यापन करून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. डॉ. होमी भाभा आणि दामोदर धर्मानंद कोसंबी यांची चरित्रे, देवांसि जिवें मारिलें (सहलेखक) ही विज्ञान-कादंबरी आणि कोलाहल, अपूर्णमित आणि …

स्त्रियांच्या ‘दौर्बल्या’बद्दल

संपादकीय एप्रिल २००३ च्या अंकात (१४:१) रा. ग. शहा यांचा एक लेख प्रकाशित झाला. त्याला ‘स्त्रियांची संख्या’ हा मथळा देऊन शेवटी मी एक संपादकीय टीप लिहिली. लेखातील मुद्दे पटले नाहीत, पण इतर वाचकांनी प्रतिवाद करावा यासाठी लेख छापत आहे, अशी ती टीप. पण वाचकांकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. याने मी तर व्यथित झालोच, पण (अर्थातच) शहा …

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-४)

मदत आणि पुनर्वसन २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून दंगलग्रस्त मुस्लिमांचे नेते मदत-छावण्या उभारून बेघर झालेल्यांना भाडोत्री वाहनांमधून तेथे नेऊ लागले. नुसत्या अहमदाबादेत ५ मार्चपर्यंत ९८ हजार माणसे (जिल्हाधिकाऱ्यांचा आकडा ६६ हजार आहे) अशा छावण्यांमध्ये वसली होती. अहमदाबाद वगळता ही संख्या ७६००० (अधिकृत आकडा २५०००) आहे. एकूण अधिकृत निर्वासित ९१००० तर ‘स्वतंत्र’ माप १,७४,००० आहे. या सर्वांच्या राहण्या-जगण्यात …

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-३)

शासकीय संगनमत “गोध्र्यानंतरचा गुजरातेतील हिंसाचार हा राज्याच्या मुख्यमंत्र्याने व शासनाने केलेला संघटित गुन्हा आहे. सरकार व त्याचे अधिकारी यांनी जे केले, व जे केले नाही, त्यावरून हे उघड होते’. गोध्र्यामागे काही पूर्वतयारी होती व ती एका मोठ्या कटाचा भाग होती, असे सिद्ध होण्याची वाट न पाहता मोदी व त्यांच्या मंत्रिगणाने बेजबाबदार विधाने करून ते सिद्धच …

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-२)

स्त्रियांवरील अत्याचार “गोध्यातील मदतछावणीतील एका बलात्कारितेची कहाणी एक वारंवार घडलेला घटनाक्रम नोंदते. तिचे मूल तिच्यासमोर मारले गेले, तिला मारहाण केली, जाळले व मृत समजून सोडून दिले. कुठेकुठे वैविध्यासाठी अॅसिड टाकले गेले.” “प्रांताभरातील लैंगिक हिंसेच्या घटनांची संख्या तर अचंबित करणारी आहेच, पण मुख्यमंत्री, मंत्री, गुजरातेतील अधिकारी व सर्वात वाईट म्हणजे भारत सरकारचे मंत्री यांनी ज्या थातुर-मातुर …

विरोधकांबाबतचा अभिमान (राजर्षि शाहू गौरव ग्रंथातून)

छत्रपतींनी “आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत. त्याचप्रमाणे चालावे,’ असा लेखी हुकूम जारी केला. “काय जाधवराव, तुम्ही तर कानांवर हात ठेवले होतेत, पण कोदंडाने दिलाच ना पुरावा काढून!” महाराजांच्या या टोमण्यावर जाधवरावादी आम्ही सगळेच हसलो. संध्याकाळी पन्हाळा लॉजवर पुराव्याचे पुस्तक पाठवून दिले. या घटनेपूर्वी करवीर शंकराचार्यांच्या पीठावर महाराजांनी डॉ. कुर्तकोटींची स्थापना केली …

काहीतरी ओळखीचे वाटते आहे का?

सामाजिक सेवा आणि (पहिल्या महा-)युद्धासाठी (शत्रुराष्ट्रांना) द्यावा लागणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ‘पोकळ पैसा’ छापल्यामुळे प्रचंड भाववाढ झाली. प िचमी राष्ट्रांनी भाववाढ रोखण्यासाठी लादलेल्या उपयांमुळे अनेक जण बेकार झाले. लोकांच्या भ्रमनिरासातून मतदारांचे उजव्या व समाजवादी पक्षांमध्ये ध्रुवीकरण झाले. दोन्ही पक्ष पहिल्या युद्धातून वाचलेल्या युद्ध साहित्याने सज्ज अशा मोठाल्या खाजगी सेना बाळगू लागले. यांच्यातील झटापटींपासून दूर राहणे …

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-१)

२२ फेब्रुवारी २००२ ला करसेवकांचा एक जथा साबरमती एक्स्प्रेसने अमदावादहून अयोध्येला गेला व २६-२७ फेब्रुवारीला परतला. दोन्ही प्रवास होत असताना जागोजागी करसेवकांनी इतर प्रवासी, स्थानकांवरील विक्रेते वगैरेंशी गैरवर्तन केले. विशेषतः मुस्लिमांशी हे वर्तन नारेबाजी व अरेरावीच्या बरेच पलिकडचे होते. फैजाबादच्या २५ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रात अयोध्येकडील प्रवासातील गैरव्यवहाराची नोंदही झाली. २७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ला गोध्रा स्थानकावर …

संपादकीय माहिती मिळवण्याचा हक्क

“लोकशाहीत जनतेच्या माहिती मिळवण्याच्या हक्काला सर्वाधिक महत्त्व असायला हवे. अशा हक्काला बांधील असलेल्या कोणत्याही सरकाराने या नागरिकांच्या समितीला उत्साहाने सहकार्य देऊन गुजरातेतील घटिते, हिंसेचे सूत्रधार आणि दोषी यांच्या चौकशीत आणि माहितीच्या प्रसारणात मदत करायला हवी होती. नागरिकांच्या समितीने मानवी स्वातंत्र्याचा हक्क बजावण्याच्या मूलभूत हेतूने या कामाला हात घातला. जेव्हा समाजात मोठे अन्याय घडतात तेव्हा समाजाचे …

संपादकीय उत्क्रांती आणि परोपकार

माणसांनी एकमेकांना मदत करावी का? ‘जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित’ त्यांना जाऊन उठवावे का? जगाचे सोडा, एका देश नावाच्या रचनेपुरता तरी असा प्रकार करावा का? की हे वागणे अनैसर्गिक आणि आत्मघातकी आहे? इथे ‘अनैसर्गिक’ असे काही करता येते का? या प्र नाला टाळून पुढे जाऊ. एक मतप्रवाह असा —- कोणत्याही जीवजातीचे …

संपादकीय नाशिकची ‘अर्थ’ चर्चा

“तेजीमंदी तर चालतच असते’, हे सामान्य व्यापार-उदीम करणाऱ्यांचे एक आवडते सूत्र असते. त्यांच्या मालाची, कसबांची मागणी बदलत जाते; आज गि-हाईक नसले तरी उद्या मिळेल असा त्यांचा विश्वास असतो. नोकरीपेशातल्या लोकांना यातला हताश भाव समजत नाही. आपण मेहनतीने कमावलेली कौशल्ये किंवा घडवलेल्या वस्तू कोणालाच नको आहेत यातून येणारी खिन्नता आणि ‘मी निरर्थक झालो/झाले आहे’ हा तो …